शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सौरवाहिनीे’तून साडेसहा लाख शेतीपंपांना वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:59 IST

पाटण : ‘पश्चिम महाराष्ट्रात वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असून, थकबाकीचे प्रमाणही कमी असल्याने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून साडेसहा लाख शेती ...

पाटण : ‘पश्चिम महाराष्ट्रात वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असून, थकबाकीचे प्रमाणही कमी असल्याने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून साडेसहा लाख शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा देणार आहे,’ अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.पाटण तालुक्यातील मरळी कारखाना येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांची उपस्थिती होती. दरम्यान, या योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पंपांना येत्या पाच वर्षांत गावोगावी प्रकल्प उभारून सहा रुपयांऐवजी केवळ २ रुपये ६० पैसे या दराने चोवीस तास वीजपुरवठा केला जाईल, अशी घोषणाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली.मंत्री बावनकुळे म्हणाले, ‘राज्यात एकूण ४४ लाख शेतकºयांपैकी २२ लाख शेतकºयांना दिवसा तर २२ लाख शेतकºयांना रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. मात्र राज्यातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत वीजबिल थकबाकी आणि वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या जिल्ह्यातील शेतकºयांना आपल्या शेती पंपासाठी आता मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी आर्थिक निधी गरजेचा असल्याने राज्यातील थकबाकीदार शेतकरी आणि वीजग्राहक यांनी किमान ३० टक्के तरी थकबाकी भरणे आवश्यक आहे, अन्यथा महावितरण आर्थिक अडचणीत येऊ शकते. याकरिता थकबाकीदार शेतकºयांनी आपली थकबाकी भरावी.’आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांच्या काळात राज्यातील ५ लाख १८ हजार शेतकºयांच्या शेती पंपांना वीज कनेक्शन दिले नव्हते. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असो वा उत्तर महाराष्ट्र असो असा कोणताही भेदभाव न करता राज्यातील २ लाख २८ हजार शेतकºयांचे प्रलंबित वीज कनेक्शन नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून येत्या आठवड्याभरात देण्यात येणार आहेत. राज्यातील एका शेतकºयाला एक ट्रान्सफॉर्मर अशी योजना राज्यात कार्यान्वित केली असून, आज या योजनेचा पश्चिम महाराष्ट्रातून प्रारंभ केला असल्याचेही बावनकुळे यांनी जाहीर केले.बंद पडलेल्या प्रकल्पाचे काम मार्गीमहाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाºया कोयना प्रकल्पाची पाहणी केली असून, गेल्या पाच वर्षांपासून कोयनेच्या ८० मेगावॅट प्रकल्पाचे बंद पडलेले काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाला आदेश देण्यात आले आहेत. लवकरच त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठक घेतली जाणार आहे. या प्रकल्पाला २० ते २२ वर्षे झाल्यामुळे या प्रकल्पामध्ये अनेक मशीन बंद अवस्थेत असून, काही जीर्ण होऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी ९५ कोटी रुपयांचा निधी गरजेचा असून, हा निधी राज्य शासन लवकरच देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले.आयटीआय युवकांसाठी जागा आरक्षितकोयना प्रकल्पातील १३० प्रकल्पग्रस्त आयटीआय झालेली युवक तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी सुचवल्याप्रमाणे संबंधित युवकांच्या मानधनात भरघोस वाढ करून वयाच्या ५८ व्या वर्षांपर्यंत त्यांना सेवेत ठेवण्याचा आणि त्यांच्यासाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे.